कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशनची होणार स्थापना : आमदार रोहित पवार

News source : https://www.agrowon.com/farming-agricultural-news-marathi-karjat-jamkhed-integrated-development-foundation-establish-soon

पुणे : मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कर्जत – जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशनची स्थापना शनिवारी (ता.१५) पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते, तर अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात होणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

मंगळवारी (ता.११) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले, की फाउंडेशनच्या माध्यमातून कृषी, ग्रामविकास, पर्यटन, आरोग्य, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रांच्या विकासासाठी काम करण्यात येणार आहे. मतदारसंघातील पीकपद्धती बदलण्यासाठी ३० गावे जलसंधारणाकरिता दत्तक घेण्यात आली असून, पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू आहे. या प्रकारच्या विविध विकासकामांच्या माध्यमातून कर्जत जामखेड मतदारसंघ पुढील पाच वर्षांत नगर जिल्ह्यात क्रमांक एक वर तर राज्यात क्रमांक पाच वर असण्याचा प्रयत्न असणार आहे.

Leave A Comment